महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार व इतर संस्थांकडून पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. सर्व सरकारी शिष्यवृत्ती / फ्रिशिप करता https://mahadbtmahait.gov.in/Login/Login या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे.
https://mahadbtmahait.gov.in/Login/Login या पोर्टलवर जाऊन login झाल्यानंतर आपल्या आधार कार्ड नंबरवर (UID) रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या शिष्यवृत्तीची माहिती घेऊन आवश्यक तो फॉर्म भरावा. सदर शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी विद्याथ्यांचे स्वतःचे स्वतंत्र बैंक खाते असणे आवश्यक असून हे बँक खाते आपल्या आधार कार्ड नंबरवर लिंक केलेले असणे अनिवार्य आहे.
स्कॉलरशिप ऑनलाईन फॉर्म भरताना आवश्यक ती सर्व कागदपत्रांच्या प्रती मा. प्राचार्यांच्या सहीने साक्षांकित (Principal's- Attested) करून Scan करून अपलोड करणे आवश्यक असते याची नोंद घ्यावी तसेच आपला फोटो व सही Scan करून ठेवावी.
सर्व गोष्टींची खात्री करून नंतरच फॉर्म सबमीट करावा. आपल्याला मिळालेला User ID व Password व्यवस्थित जतन करून ठेवावा.
ऑनलाईन भरण्याची सुविधा महाविद्यालयाच्या विद्यार्थी सेवा सुविधा केंद्रात अत्यल्प दरात उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी या केंद्रातून आपले फॉर्म भरावे.
Guidelines and Rules